Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: विना तिकीट म्हणून पकडलं, गांजा तस्कर निघाला; उच्चशिक्षित तरूणाला पोलिसांकडून बेड्या

Ganja smuggler caught on train: विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं तरूणाला पकडलं. पण त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ साडे तीन किलो गांजा सापडला आहे.

Bhagyashree Kamble

अभिजित देशमुख, साम टीव्ही

विना तिकीट प्रवास करत असल्यामुळं रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं तरूणाला पकडलं. पण त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ साडे तीन किलो गांजा सापडलाय. भावेश गायकवाड असे तरूणाचे नाव असून, तो तरूण भुवनेश्वर एक्सप्रेसमधून अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ आला होता. अधिक तपास केला असता, भावेश गायकवाड हा उच्चभ्रू कुटुंबातील असून, वाईट संगतीमुळे गांजा विकत असल्याचं समोर आलं. या प्रकरणी भावेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला एक तरूण विना तिकीट प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. तरूणाची अधिक झडती केली असता, त्याच्याकडून साडे तीन किलो गांजा आढळला. विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे त्याची झडती घेतली असता, गांजा तस्कर तरुणाचे बिंग फुटले. भावेश गायकवाड असे तरूणाचे नाव असून, तो मोहपाडा खालापूर जिल्हा रायगड येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.

भावेश गायकवाड एका उच्चभ्रू कुटुंबातील आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कॅफे सुरू केला होता. मात्र, वाईट संगतीमुळे भावेश नशेच्या आहारी गेला. त्यानंतर त्याचा कॅफे बंद पडला. त्याने सोन्याचे दागिने गहाण ठेवले. नशेच्या आहारी त्याने सर्व काही गमावले. सर्व काही गमावल्यानं पैशांची गरज भासली.

त्यामुळे भावेश गांजा तस्करीकडे वळाला. कल्याण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी भावेश विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला बेड्या ठोकल्या आहेत. भावेश विरोधात याआधी देखील असे काही गुन्हे दाखल आहेत का? त्याने गांजा कुठून आणला होता? तो कोणाला विकणार होता? याचा तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्षणात अनर्थ! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन्...; महाडमध्ये थरारक अपघात|VIDEO

Papad Chivda Recipe : शाळेतून आल्यावर मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा पापड चिवडा, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती; सूत्रांची माहिती

Viral Video: झोपेत लोळत लोळत १० व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला, ८ व्या मजल्यावर ग्रीलमध्ये उलटा लटकला, दैव बलवत्तर म्हणून...

ठाकरे घराण्याचा नवा राजकीय प्रयोग, आदित्य-अमित ठाकरे मुंबईत एकत्र; प्रचाराची सूत्रं नव्या पिढीच्या हाती|VIDEO

SCROLL FOR NEXT