Pimpri Chinchwad News : वृद्धाश्रमात केअर टेकर म्हणून काम करून वृद्धाश्रमातच चोरी करणाऱ्या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकेत माणिकराव झाडे असं वृद्धाश्रमात चोरी करणाऱ्या केअर टेकर चोरट्याचं नाव आहे. (Pimpri Chinchwad Latest Marathi News)
संकेत माणिकराव झाडे हा हिंजवडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जिव्हाळा नावाच्या वृद्धाश्रमात केअरटेकर म्हणून काम करत होता. वृद्धाश्रमात केअरटेकर म्हणून काम करत असताना संकेत झाडे यांनी वृद्धाश्रमाच्या संचालकांचे जवळपास दाेन लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले होते. (Maharashtra News)
चोरी केल्या नंतर मला कॉलेज (college) शिकायला माझ्या मुळ गावी जायचं आहे असं बनाव करून संकेत झाडे याने आपल्या गावाला पळ काढला. या चाेरी प्रकरणाचा हिंजवडी पोलिसांनी अतिशय कौशल्याने तपास केला.
या चोरीच्या गुन्ह्यात संकेत झाडे याला बेड्या ठोकल्या. संकेत झाडे याच्या ताब्यातून जवळपास दोन लाख पस्तीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत अशी माहिती आनंद भोईटे (पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त झोन टू) यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.