Ulhasnagar Crime News, cm eknath shinde, hill line police station saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या; चाॅपर, तलावरीने हल्लेखाेरांनी पसरवली दहशत

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

अजय दुधाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात रात्री मध्यरात्री एकाची हत्या झाली. ही हत्या पाच ते सहा जणांनी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पूर्व वैमन्यासातून हत्या झाल्याची चर्चा आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हिललाईन पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

जय जनता कॉलनी येथे एका जुगाराच्या क्लब बाहेर ही हत्या झाली. शब्बीर शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते जुगाराचा क्लब चालवत असतं. त्यांना नुकतेच शिंदे गटाचे (cm eknath shinde) शाखाप्रमुख पद देण्यात आले होते.

या घटनेत हल्लेखोरांनी चाॅपर, तलवार असे धारदार हत्यारांचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. हल्लेखाेरांनी शब्बीर शेख यांच्यावर दहा ते बारा वार केले. त्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.

शेख यांची परिस्थिती गंभीर बनल्याने त्यांना कल्याण येथील एका रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात (hill line police station ulhasnagar) खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस संशियत आरोपींचा तपास करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

पालिका निवडणुकीत पैशांचा पूर? तुमच्या मताचा रेट किती?

Saturday Horoscope : आजचा दिवस भाग्याचा ठरणार; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील शुभ क्षणाचे संकेत मिळणार

Onion Export: बांगलादेशात पाकिस्तानाचा कांदा; भारतीय शेतकऱ्यांचा वांदा,केंद्र सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांना पुन्हा रडवलं

SCROLL FOR NEXT