Uddhav Thackeray Latest Speech saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Latest Speech: फडणवीस ते मोदी-शाह; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे, वाचा सविस्तर

फडणवीस ते मोदी-शाह; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे, वाचा सविस्तर

Satish Kengar

Uddhav Thackeray Latest Speech: गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर कमीच दिसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्यावर याकाळात टीका-टिप्पणी केली. मात्र त्यांच्याकडून यावर कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. आज मात्र उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली आहे.

आज ठाकरे गटाच्या वतीने मुंबईतील सरदार वल्लभाई पटेल संकुल (NSCI) वरळी येथे राज्यव्यापी पदाधिकारी शिबिर 2023 आयोजित करण्यात आलं होतं. येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आज चौफेर फटकेबाजी करत आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. जाणून घेऊ त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

'सत्तेची मस्ती मणिपूरमध्ये जा आणि दाखवा'

उद्धव ठाकरेंनी मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेची मस्ती आम्ही उतरवू शकतो, हा तुमचा सत्तेचा फुगलेला फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढीच तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अधिकारी पाठवा, जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का ते बघा. तिकडे लोक त्यांना जाळून टाकतील. तिकडे लोक पेटलेली, पिसाळलेली आहेत. अमित शाहांना देखील कोणी जुमानत नाहीये. (Latest Marathi News)

'भागवत तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट करा'

आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना ही लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, ''मोहनजी भागवत, तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट कराच. तुम्ही मशिदीमध्ये जाता, तिकडे भाजप मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जातं, वारकऱ्यांवर हात उचलला जातो. त्यामुळे खरंतर तुम्ही तुमचं हिंदुत्व स्पष्ट करा.''

शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न विचारला आहे तो असा की, कर्नाटक सरकारनं सावरकरांविषयीची धडा अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावर उद्धव ठाकरे यांचे मत काय आहे. तर मी त्यांना सांगेल की, फडणवीस तुमची परिस्थिती खूप हालाखीची आहे. सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही. अशी परिस्थिती फडणवीसांची आहे.''

कारण त्यांना वरुन आदेश आहे. देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करते. पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणयातना भोगल्या त्या सावकरांच्या विचारधारेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही त्यांना तुम्ही सहभागी करुन घेता याबद्दल तुमचे मत काय? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी विचारला.

अमित शाहांना रोखठोक उत्तर

नांदेडमध्ये भाजपच्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांची समान नागरी कायद्यांबद्दल काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावं असं म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ''समान नागरी कायद्यांबद्दल उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे? तुम्ही समान नागरिक कायदा आणा, आमचा पाठिंबा आहे. समान नागरिक कायदा आणण्याच्या आधी, समान नाही, लोकसत्तेत आलेला अग्रलेख वाचा. कारण सामना अनेक लोक चोरून वाचतात आणि वरून सांगतात आम्ही वाचत नाही. समान नागरी कायदा म्हणजे काय आहे? हिंदूंना त्याचा किती त्रास होणार आहे, हे आधी लोकांना सांगा. यानंतर तुम्ही पाठिंबा मागा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT