निवृत्ती बाबर, प्रतिनिधी...
Uddhav Thackeray News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर आज मुंबईत पार पडत आहे. सकाळपासून सुरु झालेल्या सत्रात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि सुषमा अंधारे यांनी मार्गदर्शन केलं. आदित्य ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. तसेच जाणाऱ्यांना जाऊ द्या.. तुम्ही सगळे सोबत असेपर्यंत मला कोणाची पर्वा नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (Maharashtra Political News)
काय म्हणाले उद्धव ठाकरे...
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "जाणाऱ्यांना जाऊ द्या, जोपर्यंत माझ्या सोबत ही जनता आहे तोपर्यंत कितीही शहा आले तरी मला पर्वा नाही," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
तसेच यावेळी बोलताना "उद्या आपल्या शिवसेनेचा (Shivsena) वर्धापन दिन आहेआणि परवा जागतिक गद्दार दिन आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सडकून टिका केली. तसेच जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याला सोडणार नाही.." असा इशाराही त्यांनी दिला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या जाहिरात वादावरुन सडकून टीका केली. आमचा बाप एकच आहे, तुमचे बाप किती तुम्हालाच माहिती.. अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच या गद्दारांना शिवसैनिक माफ करणार नाही.. असेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही साधला निशाणा...
पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याचा वापर करून निवडणूक जिंकल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जात आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. "कर्नाटकात मोदींचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली.. काय झालं त्या निवडणुकीत, सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना.. अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान मोदी अमेरिकेत चाललेत पण मणिपूरमध्ये जात नाहीत. मोदींनी हिंमत असेल तर मणिपूर शांत करुन दाखवावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
(Maharashtra Politics)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.