Mumbai Cannabis Farm  Saam TV (AI)
मुंबई/पुणे

मुंबईत थेट बेडरूममध्येच सुरू होती हायटेक गांजाची शेती! YouTube वरून शिकला अन्...

Mumbai Cannabis Farm : मुंबईतील बोरीवलीमध्ये घराच्या खोलीत हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची बेकायदा लागवड करण्यासाठी उभारलेली लॅब पोलिसांनी उद्ध्वस्त केली. एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai hydroponic cannabis farm discovered inside home : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरातील एका खोलीत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यासाठी चक्क ‘लॅब’ उभारल्याचा धक्कादायक प्रकार बोरीवलीतील गणपत पाटील नगर परिसरात उघडकीस आला आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी धाड टाकून ही बेकायदा लॅब उद्ध्वस्त केली असून, या प्रकरणी बब्बू कामत याला अटक करण्यात आली आहे. तर यातील मुख्य आरोपी राहुल ठाकूर हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी घरातील एका खोलीत हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करण्याची पूर्ण तयारी केली होती. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया कशी करायची, याची माहिती आरोपींनी यूट्यूबवरील व्हिडिओंच्या माध्यमातून मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तापमान, आर्द्रता आणि pH नियंत्रित करण्याची यंत्रणा

पोलिसांनी छापा टाकला असता, बंद खोलीत गांजाच्या लागवडीसाठी आवश्यक वातावरण तयार करणारी हायटेक यंत्रणा आढळून आली. तेथे तापमान, आर्द्रता आणि 'pH' पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली होती. तसेच गांजाच्या रोपांच्या जलद वाढीसाठी विशेष 'ग्रो एलईडी लाइट्स'चा (LED Lights) वापर केला जात असल्याचेही आढळले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत १ लाख ६२ हजार रुपये आहे. याशिवाय सुमारे २.५ लाख रुपये किमतीचा १८९ ग्रॅम ओला गांजा आणि लागवडीसाठी वापरली जाणारी विविध उपकरणेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

एक आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधार फरार

या प्रकरणात एमएचबी कॉलनी पोलिसांनी बब्बू कामत याला अटक केली आहे. तर राहुल ठाकूर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

गांजाची लागवड किती दिवसांपासून?

दरम्यान, ही हायड्रोपोनिक गांजाची शेती नेमकी किती दिवसांपासून सुरू होती, त्यातून आतापर्यंत किती गांजा तयार करण्यात आला, आणि हा तयार केलेला गांजा नेमका कुठे पुरवला जात होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा सहभाग आहे का, तसेच आरोपींचे अमली पदार्थांच्या तस्करांशी काही संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

गांजाच्या लागवडीवर कायद्याने बंदी

भारतामध्ये कोणत्याही वैध परवानगीशिवाय गांजाच्या झाडांची लागवड करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. 'नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस' (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत बेकायदा गांजा लागवडीवर कठोर कारवाईची तरतूद आहे.

एमएचबी कॉलनी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बंद खोलीत अत्याधुनिक पद्धतीने सुरू असलेला ड्रग्जचा काळा धंदा उघडकीस आला आहे. फरार मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर या रॅकेटमधील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Tanning : बेसन दह्याची पेस्ट मिनिटांत घालवेल मानेवरची टॅनिंग, वाचा रामबाण उपाय

Healthy Fruits: सफरचंद-पेरुपेक्षाही 'ही' ५ फळं आहेत अधिक फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितली यादी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अवघ्या १० मिनिटांत बनवा कुरकुरीत मटकी

Maharashtra News Live Update: चाकण औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांवर महत्त्वाची बैठक; उद्योजकांनी मांडल्या समस्या

'संपूर्ण व्हिडीओ पाहिलाय तुला आर्ग्यू करायचं असेल तर'...; भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

SCROLL FOR NEXT