Mumbai-Pune Express Way  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way Traffic Jam: मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल; VIDEO व्हायरल

Mumbai-Pune Express Way Traffic Jam: वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

साम टिव्ही ब्युरो

दिलीप कांबळे

Pune News : सलग तीन सुट्ट्यांमुळे मुंबईहून अनेकजण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन गावी किंवा फिरायला निघाले आहे. मात्र प्रवाशांना एक्स्प्रेस वेवर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दिसत आहे. कालपासून कायम असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याने खंडाळा घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने काल सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाम झाला आहे.

सदरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत. यामुळे पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे.

तर मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूक कोंडीत सापडल्याने वाहन चालकांचे व वाहनांमधील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहन चालकांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

Dharmendra : 'घेऊनी टांगा सर्जा निघाला...' धर्मेंद्र यांचं मराठी कनेक्शन, कोणत्या चित्रपटात केले काम?

SCROLL FOR NEXT