Mahad Rain News Saam TV
मुंबई/पुणे

Rain Alert: पावसामुळे महाड तालुक्यातील गावपरिसरातील जमिनीला भेग

महाड तालुक्यातील बावळे या गावपरिसरातील जमिनीला पडलेली ही भेग उत्तर-दक्षिण असून त्याची लांबी सुमारे 15 ते 20 मीटर एवढी आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील (Raigad District) महाड तालुक्यात बावळे येथील येथील परिसरात पावसामुळे (Rain) भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.राजेश मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी या गावपरिसराला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगेची तातडीने पाहणी केली.

महाड (Mahad) तालुक्यातील बावळे या गावपरिसरातील जमिनीला पडलेली ही भेग उत्तर-दक्षिण असून त्याची लांबी सुमारे 15 ते 20 मीटर एवढी आहे. या भेगेची खोली दीड ते दोन फूट असून त्यात पाणी साठलेले आहे. या बाबीवरून ही भेग मातीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पडलेली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तथापि या भेगेबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक (Geologist) सर्वेक्षण विभाग, पुणे यांना कळविण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ -

प्राथमिक पाहणी दरम्यान या भेगांमुळे कोणताही धोका संभवत नसून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या भेगेची दररोज दोन ते तीन वेळा पाहणी करून काही बदल असल्यास स्थानिक प्रशासनास त्वरित कळविण्याबाबत संबंधित सरपंच व गावकऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT