School Holiday kalyan dombivli ulhasnagar badlapur saam tv
मुंबई/पुणे

School Holiday : मुसळधार पावसाचा अलर्ट! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरमधील शाळांना उद्या सुट्टी

holiday for schools, colleges on August 19 : मुंबई, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईपासून ते पनवेल येथील शाळांना उद्या सुट्टी जाहीर केलेली असतानाच, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूरमधील काही शाळांना उद्या, १९ ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे/ अजय दुधाणे/फय्याज शेख/सचिन कदम | साम टीव्ही टीम

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये आज, १८ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं. रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली. तर सकाळच्या सत्रातील शाळा लवकर सोडण्यात आल्या. पुढील काही तास अत्यंत धोक्याचे असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळांना उद्या, १९ ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

हवामान विभागानं पुढील काही तास आणि उद्याही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनानं हद्दीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. केडीएमसीच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी हा निर्णय जाहीर केला. हवामान विभागानं ठाणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या, मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) सुट्टी जाहीर केली आहे.

उल्हासनगरमध्येही शाळांना सुट्टी

हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन उल्हासनगर महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खासगी अनुदानित / विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना उद्या, मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीणमधील शाळांनाही सुट्टी

ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनानं ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातील शाळांना सुट्टी दिली आहे.

रायगडमध्येही शाळा-कॉलेजना सुट्टी

रायगड जिल्ह्यातही शाळा, कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यात उद्या, मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या शक्यतेमुळं जिल्हा प्रशासनानं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे महानगरपालिका आयुक्तांची बदली होताच ठाकरे गटाकडून जल्लोष

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्याचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT