Ajit Pawar on Pune Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यात सर्वत्र दाणादान, नागरिकांनी काळजी घ्यावी; अजित पवारांचं आवाहन

Pune Rain Latest Update: पुण्यात आज जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. यातच अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यात सर्वत्र दाणादान उडवली आहे.

Satish Kengar

पुण्यात आज जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. यातच अवघ्या काही तासांच्या पावसाने पुण्यात सर्वत्र दाणादान उडवली आहे. आज पुन्यात जवळपास चार ते साडेचार तास पाऊस झाल्याने पुण्यातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलं होतं. यातच आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत नागरिकांना शक्यतो घराच्या बाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

अजित पवार ट्वीट करत म्हणाला आहेत की, ''पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी मी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली आहे.''

ते म्हणाले, ''कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्या वतीनं तातडीनं उपाययोजना करण्याच्या तसंच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. या काळात नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.''

अजित पवार ट्वीटमध्ये पुढे म्हणाले की, ''नागरिकांनी काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्या अनुषंगानं राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Rakul Preet Singh: 'दे दे प्यार दे २' मधील रकुल प्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? PHOTO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर चाकणमध्ये वाहतूककोंडी

Monday Horoscope : जुने मित्र भेटणार, शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांच्या जुन्या गोष्टी नव्याने जुळून येतील

Jalna Politics: वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती; बुलढाण्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी जालन्यात टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT