water level in mumbai lakes today  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level : मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस; धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक? पाहा आकडेवारी

Water level in Mumbai Dams : मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही.

Satish Daud

मान्सूनचे आगमन होताच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. परिणामी मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र असं असलं तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

दोन तीन दिवस मुसळधार पाऊस होऊनही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये मंगळवारी एकूण ५.६४ टक्के इतके पाणी शिल्लक होते. गेल्या तीन वर्षांमधील ही नीच्चांकी आकडेवारी आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाला असला तरी पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी अशा ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्याच्या घडीला या सातही धरणांत केवळ ८१ हजार ६२३ दशलक्ष लिटर म्हणजेच ५.६४ टक्के पाणीसाठा आहे. शहराची तहान भागवण्यासाठी सध्या राखीव पाणीसाठ्याचा वापर केला जात आहे.

मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. राखीव पाणीसाठ्याला राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर महापालिकेने भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू केला आहे. हे पाणी जुलैच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.

दरम्यान, पाणीटंचाईचं संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तसेच ठाणे, भिवंडी आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाण्यातही १० टक्के कपात करण्यात आली आहे.धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT