Bhor Paddy Crop Damage After Heavy Rain | Pune Farmers Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील अतिवृष्टीचा भातशेतीला मोठा फटका; १.३३ कोटींची नुकसानभरपाई द्या

Pune Heavy Rain News : भोर तालुक्यात १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. १,८७९ शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी १ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस

  • भोर तालुक्यात १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान

  • १,८७९ शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी १ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव

सचिन जाधव, पुणे

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ४४३ शेतकऱ्यांच्या १२३.३८ हेक्टर क्षेत्रातील भात रोपांचे, तर १ हजार ४३६ शेतकऱ्यांच्या २७८.२७ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तब्बल १ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव कृषी विभागाने पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.

तालुक्यातील वेळवंड, भूतोंडे, हिडोशी आणि महुढे खोऱ्यात १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतातील ताली फुटून पाणी वाहून गेले. त्यामुळे शेतांमध्ये माती, दगड आणि गोटे साचले आहेत. काही भागांत तर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतातील सुपीक मातीच खरडून गेल्याने जमीन शेतीसाठी बाधित झाली आहे.

अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुबार लागवडीचा खर्च सहन करावा लागण्याची शक्यता आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी मोठे संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, कृषी विभागाने आपत्तीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसानभरपाईची रक्कम लवकर मंजूर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT