Pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Weather Update : पुढील ३ तास महत्वाचे, राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट?

Maharashtra Weather Update in Marathi : राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

मुंबई : राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसाने पुणेकरांनाही चांगलंच झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवासांपासून ब्रेक लागलेल्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हवामाना विभागाने पुढील ३ तासांत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, पुणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ४०-६० किमी प्रतितास वेगाने वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाने पुढील ३ तास पुण्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर काही वेळातच पुण्यात सर्वदूर जोरदार पावसांच्या सरी कोसळू लागल्या आहेत. या पावसाने पुण्यात रस्त्यावरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मंत्रालयानेही राज्यातील नागरिकांना सतर्क केलं आहे. पुढील २४ तासांत कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सांगलीतील तासगावच्या कापूर ओढ्याला पूर

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊश कोसळत आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे तासगाव शहरातील कापूर ओढा भरून वाहू लागला. या पावसामुळे कापूर ओढ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा दमदार हजेरी पाहायला मिळाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील 'असं' एकमेव राज्य जिथे आजपर्यंत रेल्वे सेवा पोहोचलेली नाही, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Jolly LLB 3 : 'जॉली एलएलबी 3'साठी अक्षय कुमारनं घेतले तगडं मानधन, इतर स्टारकास्टला किती मिळाले?

Beed : सत्तेचा मलिदा मिळाल्यावर लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार; शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे यांचा आरोप

Pune Mhada Lottery: पुण्यात स्वस्तात मस्त घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT