Hearing on ShivSenas petition in supreme court at 5 pm Order to submit documents by 3 pm on political crisis Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेच्या याचिकेवर संध्याकाळी ५ वाजता सुनावणी; दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र सादर करण्याचे आदेश

Political Crisis In Maharashtra : या याचिकेवर आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचं राजकारण आता निर्णायक स्थितीत आलं आहे. शिवसेनेने (Shivsena) राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती, याच याचिकेवर आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. आजच दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. (Political Crisis In Maharashtra)

हे देखील पाहा -

बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यपालांनी मविआला उद्याच (३० जूनला) बहमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेने ही याचिका दाखल केली होती. "आमची भीती खरी ठरली" असा युक्तिवाद वकिल अभिषेक मनू सिंघवी यांचा सर्वोच्च न्यायालयात केला. "आम्ही मागच्या सुनावणीतच भीती व्यक्त केली होती की, मधल्या काळात अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो, ती भीती खरी ठरली" असं ते न्यायालात म्हणाले आहेत.

'ठाकरे सरकारकडे बहुमत नाही'

ठाकरे सरकारकडे बहुमत नाही असा दावा देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) यांनी केला होता. याबाबत ते म्हणाले होते, आज (२९ जून) आम्ही राज्यपालांना एनडीएद्वारे एक पत्र दिलं आहे. या पत्रामध्ये राज्यातील सध्याची परिस्थिती आहे, ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत त्यानुसार शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर (NCP)आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही असं ते आमदार म्हणत आहेत. अशा परिस्थित राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव अशी विनंती करणार पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितंल.

पवारांच्या बैठकीत शिवसेनेची दांडी

मविआ सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत मविआ सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी धाव घेतली आहे. पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे, मात्र शिवसेनेचे नेते या बैठकीत गैरहजर राहिले असल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT