Floor Test: बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले आहे.
Floor Test, supreme court
Floor Test, supreme courtSaam Tv

मुंबई: राज्यपालांच्या पत्राला शिवसेनेने (ShivSena) आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या कारवाईवर दोन आठवड्यांचा वेळ दिला आणि बहुमत चाचणीला २४ तासांचा वेळ दिला, यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ही याचिका जेव्हा लिस्टेड होणार तेव्हा ही याचिका घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. उद्या अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दोण्यात आले आहेत. याविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. (Eknath Shinde Latest News)

Floor Test, supreme court
शिवसेना हरता कामा नये, शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये; शिवसेना महिला नेत्याच ट्विट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले आहे. पुढच्या २४ तासात बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश यात दिले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. (Maharashtra Political Crisis news Updates)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे.

आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीतील हॉटेल बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Floor Test, supreme court
Maharashtra Political Crisis : आता फक्त ४८ तास..., भाजप नेत्याचं सूचक ट्विट

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी धाव घेतली आहे. पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे, मात्र शिवसेनेचे नेते अद्यापही या बैठकीला आलेले नाहीत. (Sharad Pawar Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com