Anil Deshmukh यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली  
मुंबई/पुणे

Anil Deshmukh यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

आगामी सुनावणी केव्हा होणार याचा आदेश खंडपीठ लिखित स्वरूपात देणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विहंग ठाकूर

दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आज सुनावणी दरम्यान नवीन काही अर्ज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दाखल करून घेण्यात आल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी सुनावणी केव्हा होणार याचा आदेश खंडपीठ लिखित स्वरूपात देणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीची चौकशी रोखण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती.

हे देखील पहा-

अनिल देशमुख सीबीआय रिपोर्ट लीक प्रकरण

त्याचबरोबर, वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. आनंद डागा आणि अभिषेक तिवारी यांना २ दिवसाची पोलीस कोठडी दिल्ली कोर्टाने शनिवारी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी (ED Lookout Notice) केली आहे. 100 कोटी रुपयांचे वसुली आदेश प्रकरणात ईडीने (ED) ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. देशमुखांना आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना अखेर लूकआऊट नोटीस जारी जारी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Director : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Transmissible cancer: धक्कादायक संशोधन! माशांमध्ये पसरतोय दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर; माणसांसाठी किती धोकादायक?

30 दिवस नाश्ता केला नाही तर काय होईल? शरीरावर होणारे ४ परिणाम जाणून घ्या

Ragi For Diabetes : रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

SCROLL FOR NEXT