डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा कब्जा
गर्दीच्या वेळेत रेल्वे प्रवाशांची प्रचंड दमछाक
महिलां आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय
केडीएमसीच्या फेरीवाला पथक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली स्थानकाच्या महत्त्वाच्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अक्षरशः कब्जा केल्याने दररोज घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड दमछाक होत आहे. गर्दीच्या वेळेत स्कायवॉकवरून वाट काढणे कठीण होत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
स्कायवॉकवर भाजीपाला, फळे, कपडे, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जात असल्याने चालण्यासाठी मोकळी जागाच उरलेली नाही. काही ठिकाणी तर स्कायवॉक पूर्णपणे अडवला गेल्याचे चित्र असून महिलां, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताची शक्यता वाढली असून आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या सगळ्या प्रकारात केडीएमसीचे फेरीवाला पथक मात्र गायब असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांना आशीर्वाद कुणाचा?असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी केडीएमसी अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांसोबत साटेलोटे असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.
महापालिकेने तातडीने स्कायवॉकवरील अतिक्रमण हटवावे, नियमित गस्त सुरू करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.