MNS/Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

"विचारांबरोबर धर्मही बदललात का? कायदा राबवायचा असेल तर भोंग्याबद्दल राबवा"

प्रदीप भणगे

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यामध्ये उत्तर सभा घेतली होती. गुढीपाडव्याच्या शिवाजीपार्कवरील सभेनंतर राज यांच्यावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ही सभा मनसेकडून (MNS) घेण्यात आली होती.

याच ठाण्यातील उत्तरसभे दरम्यान राज ठाकरेंना मनसे नेत्यांनी तलवार भेट म्हणून दिली यावेळी त्यांनी ती तलवार सभेला दाखवल्याने नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसंच मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल केल्यामुळे आता मनसे नेते आक्रमक झाले असून मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी या प्रकरणावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटद्वारे शिवसेना केला आहे.

राजू पाटील आपल्या ट्विटमध्ये लिहितात, शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे ? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….! असं म्हणत हे ट्विट त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT