Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

घाटकोपर येथे मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) काल पाडवा मेळाव्यामध्ये म्हटले होते. यानंतर आता मनसे सैनिक आक्रमक झाले असून, आज घाटकोपर येथे मनसे-विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयावर भोंगे लावून पूर्ण दिवस हनुमान चालीसा व गणपती आरतीचा कार्यक्रम होणार आहे.

काल मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याचा मुद्दा काढला. यात ज्या मशिदीत भोंगा वाजेल त्या भोंग्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार. या सरकारला मशिदीवरील भोंगे खाली उतरावे लागतील असही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते.

प्रार्थनेला माझा विरोध नाही पण मशिदी वरील लावलेले भोंगे खाली उतरावे लागतील सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर भोंग्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार असल्याचे ठाकरे म्हणाले. प्रार्थना करा पण घरात. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिरं आहेत धाडी टाकुन बघा काय मिळणार त्यात. तुम्ही मदरशामध्ये धाडी टाका काय मिळते पहा असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर आता मनसे आक्रमक झाली आहे. आज मुंबईतील घाटकोपर येथील मनसेतच्या कार्यालयासमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्यात आली आहे. आज दिवसभर या स्पीकरवर हनुमान चालीसा आणि गणपती आरतीचा कार्यक्रम होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Today's Marathi News Live : जेपी गावित माघार घेणार की निवडणूक लढवणार? उद्या होणार निर्णय

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT