लाखोंचे मोबाईल्स चोरी करणाऱ्याला बेड्या; हेक्सा ब्लेडवरून लागला सुगावा अजय दुधाणे
मुंबई/पुणे

लाखोंचे मोबाईल्स चोरी करणाऱ्याला बेड्या; हेक्सा ब्लेडवरून लागला सुगावा

पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात फक्त एका हेक्सा ब्लेडवरून माग काढत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १० लाख रुपयांचे मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत.

अजय दुधाणे

अंबरनाथ : मोबाईलचं दुकान फोडून चोरट्याने लाखो रुपयांचे मोबाईल्स चोरून नेल्याची घटना अंबरनाथमध्ये २ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात फक्त एका हेक्सा ब्लेडवरून माग काढत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरलेले १० लाख रुपयांचे मोबाईल्स आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आलंय. (Handcuffs for stealing millions rupees of mobiles in mobile shops, Police found a clue from hexa blade)

हे देखील पहा -

अंबरनाथ पश्चिमेच्या स्टेशन रोडवरील राजेश मोबाईल्स या दुकानात २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरट्याने पत्रे फोडून प्रवेश केला होता. यानंतर ३ तास दुकानात थांबत त्याने १४ लाखांच्या मोबाईल फोन, स्मार्टवॉच यासह सीसीटीव्हीचा डिव्हीआर सुद्धा चोरून नेला होता. या चोरीमुळे पोलिसांना मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अखेर घटनास्थळी सापडलेल्या हेक्सा ब्लेडवरून चोरट्याचा मग काढत पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या. महमद फिरोज नईम अहमद असं या चोरट्याचं नाव आहे. या चोरट्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री तो राजेश मोबाईल्स या दुकानाच्या छतावर असलेल्या सिमेंटच्या पत्र्यांवर चढला. हे पत्रे फोडून आत असलेली लोखंडी ग्रील त्याने हेक्सा ब्लेडने कापली. यानंतर दुकानात प्रवेश केला. त्यानंतर तब्बल तीन तास थांबून त्यानं निवडून निवडून महागातल्या फोन्सची आणि स्मार्ट वॉचची चोरी केली.

ही घटना दुसऱ्या दिवशी उघड होताच मोठी खळबळ उडाली. स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र अखेर पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या हेक्सा ब्लेडच्या साहाय्याने चोरट्या महमद फिरोज नईम अहमद याचा मग काढत त्याला बेड्या ठोकल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महमद फिरोज हा अंबरनाथच्या मोहन नॅनो इस्टेट या मोठ्या गृहसंकुलात वास्तव्याला आहे. फक्त तिसरीपर्यंत शिकलेला हा चोरटा आत्तापर्यंत तीन वेळा दुबईला फिरून आलाय. त्याला महागड्या मोबाईलचा शौक असून त्याच्या वैयक्तिक वापराचे दोन आयफोन, एक आयपॅड, एक लॅपटॉप सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय. विशेष म्हणजे इतकी मोठी चोरी करणाऱ्या या चोरट्यावर आधीचा एकही गुन्हा दाखल नसून त्यामुळे हा लॉकडाऊनमुळे तयार झालेला चोरटा आहे का? याही अनुषंगाने पोलीस तपास करतायत. महमद फिरोज याला सध्या ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT