Gunaratna Sadavarte Saam Tv
मुंबई/पुणे

Gunaratan Sadavarte: महेश वासवानींनी सोडलं सदावर्तेंचे वकीलपत्र - सूत्र

वकील गुणरत्न सदावर्तेंचे वकील महेश वासवानींनी त्यांचं वकीलपत्र सोडल्याची माहिती आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: वकील गुणरत्न सदावर्तेंचे वकील महेश वासवानींनी त्यांचं वकीलपत्र सोडल्याची माहिती आहे. याबाबत सध्या अधिकृत माहिती नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार महेश वासवानींनी त्यांचं वकीलपत्र सोडलं आहे (Gunratan Sadavartes LawyerMahesh Vaswani Left The Case).

महेश वासवानींनी जिल्हा न्यायालयात हा खटला लढण्याचा पूर्ण प्रयत्नव केला होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, सदावर्ते यांचे वकील वासवानींनी त्यांचं वकीलपत्र सोडलं आहे. आता सदावर्ते यांची ही लढाई कोण पुढे नेणार असा प्रश्न आहे. सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या वकील आहेत. त्या हा खटला लढणार का हे पाहावं लागणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंवर (Gunratan Sadavarte) ज्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे पोलीसही वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत. आज सदावर्ते यांना गिरगाव सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदावर्ते यांच्यावरील सुनावणी सध्या सत्र न्यायालयात सुरुये. सातारा पोलीसही गिरगाव सत्र न्यायालयात दाखल झाले. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांच्याशी चर्चा केली.

सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत

सदावर्ते यांच्याविरोधात फलटण येथे एक प्रकरण दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा पोलीस अधिकारी भगवान निंबाळकर हे आज गिरगाव सत्र न्यायालयात आले आहेत. फलटणच्या एका प्रकरणात ते सदावर्तेंचा ताबा घेणार आहेत.

ताबा मागण्यासाठी सातारा पोलीस अर्ज करतील. मात्र, गावदेवी केसमध्ये त्यांना कोठडी होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात कोर्टाकडे ताबा मागण्यासाठी सातारा पोलीस दाखल झाले आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT