3-year-old sister physical assaulted by elder brother Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Midnight firing in Vadgaon Maval : वडगाव मावळ येथील केशवनगर परिसरात रात्री ११ वाजता गोळीबाराची ही घटना घडली. मुलीला शाळेतून घरी सोडल्याच्या जुन्या वादातून आरोपींनी गोळीबार केला.

Namdeo Kumbhar

  • वडगाव मावळ येथील केशवनगर भागात रात्री ११ वाजता गोळीबार

  • मुलीला शाळेतून घरी सोडल्याच्या जुन्या वादातून फायरिंग

  • चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र ते फरार

  • घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती व दहशत पसरली

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

मावळमधील वडगाव रात्री ११ वाजता गोळीबाराने हादरले. जुन्या भांडणाच्या वादातून फायरिंग झाल्याची माहिती समोर आळी आहे. भावकीतील मुलीला शाळेतून घरी का सोडलं? त्या कारणामुळे दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी धाडधाड फायरिंग केली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण आरोपी फरार झाले होते. फिर्यादीच्या तक्रारीनंतर मावळ पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मावळच्या वडगाव मधील केशवनगर परिसरात झालेल्या जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात तसेच गावात प्रचंड दहशत पसरली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजीत राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ व प्रथमेश दिवे अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ हा वडगाव येथील एका शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने अभिजित व रणजित यांच्या भावकीतील मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडले. त्यावरून आरोपींनी त्याला शाळेच्या बाहेरून मोटारीमध्ये घेऊन मारहाण केली.

अतुल सावे व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्षय हा त्याच्या मित्रांसह केशवनगर येथील एकवीरा चौकात बसलेले असताना चारही आरोपी तेथे दुचाकीवरुन आले. सौरभ याने शिवीगाळ करून लगेच पिस्तुल बाहेर काढून ते अक्षयच्या दिशेने झाडले. परंतु त्यामधून गोळी निघाली नाही. अक्षय व त्याचे मित्र तिथून पळून जात असतानाच आरोपीने पुन्हा एकदा गोळी झाडली. परंतु अक्षयला गोळी लागली नाही. तो जवळच असलेल्या सोसायटीत जाऊन लपून बसला. त्यानंतर सर्व आरोपीनी दुचाकीवरून पळ काढला. या घटनेमुळे स्थानिक नागरीकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र भररस्त्यात खुलेआम गोळीबार झाल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

IND W vs PAK W: अग बया! चेंडू खेळला पण क्रीझमध्ये बॅट ठेवायची विसरली अन्...; पाकिस्तानची कर्णधार पंचांना थेट भिडली

Two Group Clash : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात राडा; वाहन आणि दुकानांची तोडफोड, पोलिस आयुक्तांसहित अनेक जखमी

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Ro-Ro Service: 200 प्रवासी आणि 75 वाहनं असलेली रो रो बोट अडकली; विरारच्या समुद्रातील थरार

SCROLL FOR NEXT