Gunratna Sadavarte News updates, ST Strike News Updates SaamTvNews
मुंबई/पुणे

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केलं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले. दोन्हीबाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने आपला निकाल दिला आहे. गुणरत्न सदावर्तेंना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी त्यांची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली होती. (Gunratna Sadavarte News Updates)

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काहींनी चपला भिरकावल्या. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी (Police) सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर सदावर्तेंवर गुन्हा नोंदवून अटक केली होती.

त्याचबरोबर सदावर्तेंवरती एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 ते 400 रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोपही आहे. तब्बल 74 हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. अनेक ठिकाणच्या आगारातील कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन गुणरत्न सदावर्तें आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT