Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune GBS News: पुणेकरांनो काळजी घ्या! मेंदू व्हायरसचा विळखा वाढतोय, १४ जण व्हेंटिलेटरवर, एकाचा मृत्यू

GBS Patients on Ventilator: पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा तरूण मुळता सोलापुरातील आहे. उपचार घेतल्यानंतर त्याला पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाला होता.

Bhagyashree Kamble

कोरोनाच्या संकटानं संपूर्ण देशात थैमान घातलं होतं. आता पुण्यात आणखीन एका आजारानं डोकं वर काढलंय. हा आजार म्हणजे गुईलेन बॅरे सिंड्रोम. या आजाराचे रूग्ण पुण्यात वाढलेत. तसेच २५ जानेवारीला २४ जण व्हेंटिलेटरवर असण्याची माहिती समोर आली होती. पण १० जणांना डिस्चार्च देण्यात आलं असून, आता १४ रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. अशातच पुण्यातील कोणत्या भागात किती रूग्ण आहेत. याची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रस्‍त्‍यावर रुग्‍णांची संख्‍या सर्वाधिक आहे.

२५ जानेवारीला गुईलेन बॅरे रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती. रूग्णांचा आकडा ७३ वर पोहोचला होता. जीबीएसच्या वाढत्या रूग्णांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल सर्व्हेलन्स युनिटनं दखल घेतली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी हे युनिट पुण्यात पाठवण्यात आलं आहे. अशातच पुणेकरांना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी म्हणजेच २५ जानेवारीला एकही रूग्ण सापडले नसून, १० रूग्ण बरे झाले असून, १४ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे.

कुठल्या भागात किती रूग्ण?

पुणे शहर

बाजीराव रस्‍ता: १

पर्वती दर्शन: १

माणिक बाग, सिंहगड रस्‍ता: ४

दांडेकर पूल: १

धायरी: ३

संतोषनगर, कात्रज: १

पुणे ग्रामीण

किरकटवाडी: १४

नांदेड सिटी: ७

कोल्‍हेवाडी: १

खडकवासला: ६

नांदेड फाटा: २

आंबेगाव: १

डीएसके विश्‍व: ८

नांदेड गाव: ४

वाघोली: १

पिंपरी चिंचवड

संत तुकाराम नगर: १

थेरगाव: २

पिंपरी: १

इंद्रायणीनगर, भोसरी: ३

पिंपळे गुरव: २

चिखली; १

केळगाव केढ: १

पत्‍ता नसलेले: ३

चिंचवड: १

जीबीएस बाधित रूग्णाचा मृत्यू

पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरातील डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात जीबीएस रूग्णाची लागण झाली होती. तब्येत खालवल्यानं त्याला सोलापूरच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून त्याला डिस्चार्च देण्यात आला होता. परंतु परत श्वासनाचा त्रास झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT