Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Guillain-Barré Syndrome: मेंदू व्हायरसचं थैमान, २४ पेशंट व्हेंटिलेटरवर; केंद्राचं पथक पुण्यात

GBS outbreak in Pune: आरोग्य विभागाकडून गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रूग्णांबाबत नवी अपडेट जारी करण्यात आलीय. पुण्यात जीबीएस रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, हा आकडा आता ७३ वर पोहोचलाय.

Bhagyashree Kamble

कोरोनाच्या संकटातून देश सावरत असताना एका नव्या आजारानं डोकं वर काढलंय. पुण्यात मागील काही दिवसांपासून जीबीएस अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं थैमान घातलंय. दिवसेंदिवस या आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत चाललीय. आता हा आकडा ७३ वर पोहोचला असून, यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. राज्य सरकारनं नागरीकांना तब्येत जपण्याचा सल्ला दिलाय.

आरोग्य विभागाकडून गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रूग्णांबाबत नवी अपडेट जारी करण्यात आलीय. पुण्यात जीबीएस रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, हा आकडा आता ७३ वर पोहोचला आहे. या पैकी ४४ रूग्ण हे पुणे ग्रामीण भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ४७ पुरुष तर २६ महिला रूग्ण आहेत. तर, २४ रूग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे.

जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल सर्व्हेलन्स युनिटनं दखल घेतलीय. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक पुण्यात पाठवण्यात आलंय. या ७३ रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६ रूग्ण, ४४ रूग्ण हे पुणे ग्रामीण भागातील आहेत, तर पुणे महापालिका भागातील ११ आणि पिंपरी चिंचवडमधून १५ रूग्णांचा समावेश आहे. तसेच किरकिटवाडीमध्ये १४, तर डीएसके विश्व ८, नांदेड शहर ७ आणि खडकवासलामध्ये ६ रूग्ण आढळले आहेत.

गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा ही कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचं उघड झालंय. दूषित पाणी आणि अन्नातून हा आजार होत असल्याचं समोर आलंय. सुरुवातीला पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि हातापायांना मुंग्या येणे यांसारख्या लक्षणं दिसून येतात. हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत आहे. ९ वर्षापर्यंत असलेले १३ रूग्ण तर, ६० ते ६९ वयोगटातील १५ रूग्ण आढळल्याची माहिती आहे. हा आजार लहान मुलं आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT