नवी मुंबईकरांसाठी गूड न्यूज! ऐरोलीत भव्य नाट्यगृह उभं राहणार Saam Tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईकरांसाठी गूड न्यूज! ऐरोलीत भव्य नाट्यगृह उभं राहणार

नवी मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या ऐरोली येथील नाट्यगृह लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.

विकास मिरगणे

नवी मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या ऐरोली येथील नाट्यगृह लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. आमदार नाईक यांनी या नाट्यगृहासाठी विकास निधीतून 25 लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. या नाट्य गृहासाठी 56 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबईतील एकमेव नाट्यगृह वाशी येथे आहे.

ऐरोली क्षेत्रातील नाट्य व कला रसिकांना वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात किंवा ठाणे येथे राम गणेष गडकरी रंगायतनात नाटक पाहण्यासाठी जावे लागते. प्रवासात त्यांचा पैसा आणि वेळही जातो. नाटय रसिकांची ही गैरसोय होत असे. मुंबईकरांसाठी आणखी एक नाटयगृह व्हावे यासाठी या नाटयगृहासाठी ऐरोलीत सिडकोकडून पालिकेसाठी भुखंड हस्तांतरित करून घेतला. त्यानंतर पालिकेकडे पाठपुरावा करून नाटयगृह बांधण्याचा प्रस्ताव स्थायी तसेच महासभेत मंजूर करून घेतला आहे.

नाटयगृहातील आसनक्षमता एकाच वेळेस 860 लोक एकत्र बसून नाटक पाहण्याचा आनंद घेवू शकतात. 2014-15 सालीच या नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि ठेकेदाराने सोडून दिलेले काम यामुळे नाट्यगृहाचे काम रखडले आहे.

अशी आहे नाट्यगृहाची रचना...

एकुण अंदाजित खर्च 70 कोटी रूपये

पहिले तळघर - ९४ वाहनांसाठी कार पार्किंग ४१ वाहनांसाठी दुचाकी पार्किंग.

दुसरे तळघर- ९४ वाहनांसाठी कार पार्किंग ४१ दुचाकी वाहनांसाठी पार्किंग.

तळमजला - तिकीट घर, महिलांसाठी दोन आणि पुरुषांसाठी दोन प्रसाधनगृहे ,रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार आणि प्रदर्शनीय क्षेत्र.

पहिला मजला - मेकअप रूम महिलांसाठी दोन आणि पुरुषांसाठी दोन प्रसाधनगृहे ,अपंगांसाठी पुरुष आणि महिलांकरिता प्रत्येकी एक प्रसाधनगृह उपहारगृह.

दुसरा मजला - ग्रीन रूम, प्रशासकीय दालन आणि बहुउद्देशीय सभागृह.

तिसरा मजला - अधिकारी कक्ष, प्रसाधनगृह सह अतिथीगृह आणि उपहारगृह.

चौथा मजला - प्रसाधनगृह सह विशेष अतिथीगृह आणि अधिकारी कक्ष.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT