मुंबई: ठाण्यातील महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला अधिकाऱ्याला हाताची दोन बोटे गमवावी लागली होती. तसेच या महिला अधिकाऱ्याला वाचवत असताना त्यांच्या अंगरक्षकाचाही एक बोट कापला गेला. हा फेरीवाला परप्रांतीय आहे. या प्रकारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचंड संतापले आहेत. ''यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील'' अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. (Raj Thackeray was angry at the peddlers who cut off the fingers of a woman officer)
हे देखील पहा -
काय म्हणाले राज ठाकरे?
“पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा संतप्त इशारा राज ठाकरेंनी दिला.
नक्की काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचे पथक घोडबंदर भागातील कासारवडवली या ठिकाणी मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतांनाच संतप्त झालेल्या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली ती तुटुन खाली पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले आहे. अखेर अमरजीत यादव या परप्रांतीय फेरीवाल्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.