Breaking: अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत

मनी लाँर्डिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचेही नाव समोर आले आहे
Breaking: अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत
Breaking: अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नाहीतSaam Tv

सुरज सावंत

मुबंई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब मंगळवारी ईडीसमोर मनी लाँड्रिंग प्रकरणी हजर होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या वकिलांनी ईडीला पत्र पाठवून परब यांना नियोजित सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, ईडीने परब यांच्या ईडी चौकशी संबधित केसचा तपशील देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

तथापि, अनिल परब यांच्याऐवजी आज त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. परब यांच्या वकिलांनी ईडीकडे १४ दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे. ईडीने परीवहन मंत्री अनिल परब यांचे पत्र स्वीकारले असून अनिल परब यांना वेळ द्यायचा की, त्यांना दुसरे समन्स काढायचे या विचारात ईडीचे अधिकारी आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, मनी लाँर्डिंग प्रकरणी ईडीने मंत्री परब यांना 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी काल परब यांचे निकटवर्तीय आणि नागपूर परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर सोमवारी ईडीने छापेमारी केली. बदली प्रकरणात वसुली केल्याचा आरोप खरमाटे यांच्यावर करण्यात आला आहे. मनी लाँर्डिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचेही नाव समोर आले आहे. त्यांमुळे खरमाटे आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पैसे वसुल करत परब यांना पोहचवले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.

Breaking: अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत
कोरोनामुळे मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ, शासकीय मदतीची गरज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशिर्वाद यात्रेदरम्यान महाड पोलीसांनी अटक केली. यादरम्यान राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मुख्यमंत्री ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये चागंलाच राडा पाहायला मिळाला. मात्र दोन दिवसापुर्वी या यात्रेची सांगता झाली आणि काही तासातच मंत्री अनिल परब यांना ईडी ची नोटीस आली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनाही ईडीने नोटीस धाडत त्यांच्या काही मालमत्तांची चौकशी सुरु केली. ज्यामुळे आता राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते केंद्रसरकार सुडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप करत आहेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com