लातूर - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा Corona कहर काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक छोट्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे शासनाची बंधन तर दुसरीकडे मागणीची कमतरता यामुळे मूर्ती कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत केली पण गावखेड्यातील कारागीर उपेक्षित राहिले असून त्यांना शासन मदतीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
हे देखील पहा -
सध्याला सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यात हिंदू धर्मियांच्या सणांची मोठी रेलचेल असते या महिन्यात गणपती, गौरी, रक्षाबंधन, पोळा, दसरा आदी सणांचा उत्सव साजरा केला जातो. राज्यात सामूहिक सणात गणपती उत्सवाला मोठे महत्त्व आहे. शासनाने यावर्षी चार फुटापेक्षा उंच मूर्तीला बंदी घातली आहे या गणपतीच्या मुर्त्या तयार करण्यासाठी किमान दहा महिन्याचा कालावधी लागतो त्यास किमान 8 ते 10 कारागिरांची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. मजुरीची मोठी भर आहे. तर सध्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची जबर दहशत सामान्य नागरिकांच्या मनात आहे. यामुळे सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाची मागणी कमी झाली आहे. यामुळे उत्पादित गणेश मुर्त्यांच्या मागणीत घट झाल्याने त्याचा विक्रीवर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने या मुर्तीकारांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.