आता कर्णकर्कश हॉर्न ऐवजी ऐकू तबला, पेटी आणि बासरीचे स्वर

कर्णकर्कश हॉर्न ऐवजी भारतीय वाद्यांचा वापर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
आता कर्णकर्कश हॉर्न ऐवजी ऐकू तबला, पेटी आणि बासरीचे स्वर
आता कर्णकर्कश हॉर्न ऐवजी ऐकू तबला, पेटी आणि बासरीचे स्वरSaam Tv
Published On

नागपूर - भविष्यात रस्त्यावरून चालत असताना हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजांऐवजी पेटी, तबला, तानपुरा किंवा बासरीचा आवाज कानी पडले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हॉर्नऐवजी आता भारतीय वाद्यांचा वापर करण्याच्या दिशेने पावलं पडत असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वायूप्रदुषणासोबत सध्या नागपुरत ध्वनीप्रदुषणदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक वाहनचालक आपल्या गाडीला मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवून घेतात.अनेकजण गरज नसताना इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कर्णकर्कश हॉर्न वाजवत असल्याचे आढळून आले आहे.

हे देखील पहा -

तर अनेकदा या कर्णकर्कश हॉर्नमुळे वाहनचालकांचे वाहनांवरचे नियंत्रण सुटून अपघात देखील होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे टाळण्यासाठी आता कर्कश ह़ॉर्नच्या जागी भारतीय वाद्यांचा वापर करता येईल का, याचा विचार करण्याचे आदेश वाहतूक मंत्रालयाला देणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

रस्त्यावर वाहनांच्या गर्दीत सतत मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजत असल्याने वाहनचालकांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही त्रस्त झाले आहेत. रस्त्याजवळ राहणारे नागरिक, घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवरदेखील या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचे विपरित परिणाम होत असतात. तसेच यामुळे वेगवेगळे आजार असणाऱ्या रुग्णांना देखील त्रास होतो.

आता कर्णकर्कश हॉर्न ऐवजी ऐकू तबला, पेटी आणि बासरीचे स्वर
पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

हॉर्नचा उद्देश पूर्ण व्हावा मात्र कुणालाही या आवाजाचा कर्णकर्कश हॉर्नचा त्रास होऊ नये, यासाठी एक अनोखी कल्पना नितीन गडकरी यांनी मंत्रालयाला सुचवली आहे. त्यानुसार तबला, तनपुरा, बासरी, पेटी यासारख्या भारतीय वाद्यांचा वापर करून नव्या प्रकारचे हॉर्न तयार करण्यावर विचार सुरू आहे. हे हॉर्न काही वर्षांनी बाजारात दाखल होतील आणि मग रस्त्याने जाताना संगीत कानावर पडत राहिल, असे देखील नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com