पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून Pune Police आचारसंहिता Rules जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेनुसार पुणेकरांना यंदा देखील सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे.
कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंधांचे सावट कायम असणार आहे.सलग दुसऱ्या वर्षी देखील गणेशोत्सव आता कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने कराव. तसेच गणेश मंडळांनी आरोग्य सेतु अॅप वापरण्यास प्राधान्य देऊन सामाजिक उपक्रम राबविताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
नागरिकांना बाप्पांच्या दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहेत.आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आचारसंहीता तयार केली आहे. या आचारसंहीतेचे पालन करण्याचेही नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, पोलिसांकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.
अशी असणार नियमावली?
- सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फूट राहणार
- घरगुती गणेशमूर्ती २ फूट उंचीची असावी
- मुर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी
- मोकळ्या जागांवर मुर्ती विक्रीची व्यवस्था- श्रींच्या आगमन व विसर्जनासाठी मिरवणूक काढू नये
- श्रींचे आगमन आणि विसर्जनासाठी कमीत कमी लोकं एकत्रीत येतील
- मंदिरे असलेल्या मंडळांनी श्रींचे मंदिरातच प्रतिष्ठापना करावी
- मंदिरे नसणाऱ्यांसाठी महापालिकेच्या नियमानुसार छोट्या मंडपास परवानगी
- आरती व पुजेसाठी 5 व्यक्ती हजर राहतील
- गर्दी होईल, असे उपक्रम टाळावेत
- श्रींच्या दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन करावी
- नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी
- सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्य उपक्रम राबवावे
- संरक्षणासाठी पाच कार्यकर्ते किंवा खासगी सुरक्षा रक्षक २४ तास ठेवावेत
- आरोग्य सेतु ऍप वापरणे बंधनकारक
- सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा बंधनकारक
- विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही
- ८४ नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती
- विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल
- सार्वजनिक घाट, नदी, नाल्यावर विसर्जनास मनाई
- घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करावे
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.