मुंबई: राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवले आहे. विजनिर्मितीसाठी (MSEDCL Load Shedding) पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्यामुळे भारनियमनाचा सामना आता राज्याला करावा लाहगणार आहे. जूनपर्यंत भारनियमन (Loadshedding) असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यात कोळशाची कमतरता जाणवत आहे. सहा ते सात दिवसांच्या कोळशाच्या साठ्यावर वीज निर्मिती केली जात आहे. भारनियमामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजप नेते सुधीर मनगुंटीवार यांनी केली आहे.
आता राज्यात महावितरण विभागाने काही भागात ८ तास रात्री तर काही भागात दिवसा ८ तास वीज मिळणार आहे. मुंबई महानगर भागातील कल्याण भागात आहेत, भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही. पण उर्वरीत महाराष्ट्रात भारनियमन होणार आहे.
राज्यात ऐन उन्हाळ्यात भारनियमन सुरु केल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. उन्हामुळे पिकांना जास्त पाण्याची गरज असते पण आता भारनियमामुळे (Loadshedding) यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
'जर लोड शेडींग रद्द करता येत नसेल तर ज्या शेतकऱ्यांचं पाण्या अभावी नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई द्या' अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी जास्त खर्च करुन पिकांची मशागत केली आहे. त्या खर्चाची भरपाई द्यायला पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. सरकार फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याची टीकाही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.