Cm Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासात रद्द, काय आहे कारण?

CM Women Empowerment Campaign : मुख्यमंत्री कार्यालयातूनच हा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे

Mumbai News :

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासाच्या आत रद्द करण्यात आला आहे. शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्याचा शासन निर्णय बुधवारी २० सप्टेंबरला काढण्यात आला होता.

पण २४ तासाच्या आत हा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातूनच हा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निर्णयात काही बदल करायचे होते आणि शुद्धीपत्रक काढायचे होते पण मुख्यमंत्री आणि बालविकास मंत्री गणेशोत्सवात व्यस्त असल्याने थेट निर्णय रद्द करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर या अभियानाचे नियंत्रण महिला व बालविकास विभागाचे सचिव करणार होते. अभियानाचे प्रमुख महिला व बालविकास विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी जिल्ह्याचे अभियान प्रमुख होते. आता यात बदल केला जाणार आहे. (Political News)

मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिल्याने शासन निर्णय गुरुवारी रद्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे हे विशेष अभियान आहे, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी अभियानाचे प्रमुख असणे योग्य राहील.  (Latest Marathi News)

कारण जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुख यांना तसे निर्देश देणे सोईचे होईल. त्याशिवाय अभियानाला गतीही मिळणार नाही. हा बदल करायचा असल्याने शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT