Govandi Crime News father killed Daughter and son in law due to inter-religious love marriage in mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: गोवंडीत सैराटची पुनरावृत्ती, आधी चिरला जावयाचा गळा; नंतर मुलीलाही संपवलं, भयानक घटना!

Govandi Crime News: मुलीने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केल्याने कुटुंबियांना राग अनावर झाला. त्यांनी गोड बोलून जावयाला घरी बोलावलं. त्यानंतर त्याची गळा चिरून हत्या केली.

Satish Daud

Father killed Daughter and Son-in Law

मुलीने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केल्याने कुटुंबियांना राग अनावर झाला. त्यांनी गोड बोलून जावयाला घरी बोलावलं. त्यानंतर त्याची गळा चिरून हत्या केली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मुलीचाही गळा आवळून खून केला. अंगावर काटा आणणारी ही घटना मुंबईतील गोवंडी परिसरात घडली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

करण चंद्र (वय २२ वर्ष) आणि गुलनाज खान (वय २० वर्ष) अशी हत्या झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Police) मृत मुलीचे वडिल गोरा खान, भाऊ सलमान खान, त्याचा मित्र मोहम्मद कैफ, नौशाद खान यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून गुलनाज खान ही गोवंडी परिसरात (Mumbai Crime News) राहत होती. एकाच परिसरात राहत असल्याने दोघांमध्ये ओळख झाली. कालांतराने दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले.

मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्याने तिच्या वडिलांच्या मनात राग होता. याच रागातून त्यांनी दोघांची हत्या करण्याचा प्लान आखला. आरोपींनी दोघांनाही घरी बोलावलं. आरोपींनी आधी जावयाची गळा चिरुन हत्या केली. नंतर मुलीचाही गळा आवळून खून केला. हत्येनंतर दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

पोलिसांना पोलिसांना प्रथम मुलाचा मृतदेह सापडला होता. मात्र, तपास करीत असताना या प्रकरणाचा उलगडा झाला. प्रेमविवाह केल्याने आपणच जावई आणि मुलीची हत्या केली, अशी कबुली मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT