मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
आमदार शेखर निकम हे बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पुलाच्या खाली उभे राहूनच ते अधिकाऱ्यांना सूचना देत होते. त्याचवेळी पुलाजवळ मोठा आवाज झाला. पूल कोसळत असल्याचं लक्षात येताच आमदार निकम यांच्यासह तेथे उपस्थित असलेले अधिकारी बाजूला पळाले.
त्यानंतर काही क्षणातच गर्डरसह उड्डाणपूल कोसळून जमीनदोस्त झाला. आमदार निकम यांच्यासह तपासणी अधिकाऱ्यांनी वेळीच पूलाखालून वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आमदार निकम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याला दुखापत झाली.
या थरारक घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की आमदार निकम हे पुलाखाली उभे राहून अधिकाऱ्यांना काही सूचना देताना दिसून येत आहे. त्यावेळी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळतो.
ही बाब लक्षात येताच निकम यांच्यासह अधिकारी पुलाखालून मोकळ्या जागी धाव घेतात. आमदार निकम बाजूला होताच काही क्षणातच हा उड्डाणपूल जमीनदोस्त होताना दिसून येत आहे. आमदार शेखर निकम यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादीचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी हेही किरकोळ जखमी झाले आहेत.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.