Goregaon Mulund Link Road Saam Tv
मुंबई/पुणे

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

Goregaon Mulund Link Road Work Update: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम आता सुरु झाले आहे. बोगद्यासाठी TMT मशीन आणण्यात आले आहे. या कामाला आता गती आली आहे.

Siddhi Hande

मुलुंड गोरेगाव लिंकचा काम सुरु

मुंबईसह ठाणेकरांची वाहतूक कोंडी फुटणार

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला जोडणार

आता मुंबई पूर्णपणे जोडली जाणार आहे. गोरेगाववरुन थेट मुंलुंड गाठता येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाचे काम सुरु झाले आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडलाही जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना खूप फायदा होणार आहे. यामुळे मुंबई, पश्चिम उपनगरांसह ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील जुळ्या बोगद्याच्या कामासाठी TBM (बोगदा खनन मशीन) चे सुटे भाग शाफ्टमध्ये उतरवण्यास सुरुवात झाली आहे. हे काम नियोजित वेळेपेक्षा ३ महिने आधीच सुरु झाले आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. भविष्यातदेखील हे काम खूप वेगवान पद्धतीने होण्याची अपेक्षा आहे. या कामाची महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

दोन जुळे बोगदे

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा १२.२० किमी लांब असणार आहे. त्यात ४.७० किमीचे जुळे भूमिगत बोगदे असणार आहे. हे बोगदे १४.२० मीटर रुंद असणार आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात १३ मीटरचा भाग असणार आहे.

मुंबईतील सर्वात मोठी १४.४९ मीटर व्यासाची TBM मशीन प्रकल्पात वापरणार आहे. TBM चे वजन प्रत्येकी २१७५ मेट्रिक टन आहे. टेराटेक कंपनीची ही मशीन आहे. या मशीनमुळे काम सोपे आणि जलद होणार आहे. यामुळे दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद व ३० मीटर खोल लॉन्चिंग शाफ्ट तयार केले जाणार आहे.

८०० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे TBM चे भाग शाफ्टमध्ये उतरवले जात आहेत.१३५ मेट्रिक टन वजनाचा मुख्य शिल्ड भाग यशस्वीपणे उतरवला आहे. बोगद्यात वायुवीजन, अग्निसुरक्षा आणि पर्जन्यजल मॅनेजमेंट यंत्रणा बसवली आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टीबीएम मशीन मुलुंडच्या अमर नगर येथून बाहेर काढण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT