Hadapsar Bullet Train Saam Tv
मुंबई/पुणे

Hadapsar Bullet Train: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हडपसरला मिळणार बुलेट ट्रेन स्थानक; वाचा सविस्तर

Mumbai Pune Bullet Train Hadapsar Station: मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेनचं काम लवकरच सुरु होणार आहे. या ट्रेनच्या मार्गात हडपसर येथे स्थानक तयार केलं जाणार आहे.

Siddhi Hande

मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन धावणार

पुण्यात दोन बुलेट ट्रेन स्थानके

हिंजवडी आणि हडपसरमध्ये स्थानके उभारणार

देशात बुलेट ट्रेनचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान आता पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. हा मार्ग दुहेरीकरणाचा आहे. पुणे मुंबई मार्गावर ४५ किलोमीटरच्या अंतरावर बोगदे आणि पूल असणार आहे. यामुळे लोणावळ्यात स्थानक उभारता येणार नाही. त्यामुळे हिंजवडीत स्थानक प्रस्तावित आहे. त्यानंतर पुण्यात हडपसर भागात बुलेट ट्रेनचं स्थानक उभारण्याची अपेक्षा आहे.

पुण्यात बुलेट ट्रेनची दोन स्थानके (Pune Bullet Train Two Stations Hinjewadi and Hadapsar)

पुण्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यामुळे पुण्यात बुलेट ट्रेनची स्थानके असणार आहे. यामध्ये हिंजवडीत स्थानक उभारणार आहे. त्यानंतर हडपसरमध्येही अजून एक स्थानक होणार आहे. या स्थानकांच्या कामासाठी तब्बल चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

बुलेट ट्रेन ताशी ३५० किमी वेगाने धावते. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा विचार करुन विशिष्ट पद्धतीने स्थानक बांधण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई पुणे हैदराबाद मार्गाचा प्रकल्प अहवाल सादर केला होता. त्यानंतर आता निधी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद बुलेट ट्रेनच्या कामाला एकत्रच सुरुवात होणार आहे.

पुण्यात हडपसरला बुलेट ट्रेनचं स्थानक मिळण्याची कारणे

  • बुलेट ट्रेनचं स्थानक पुण्याच्या मध्यवर्ती भागात उभारायचे होते. मात्र, या ठिकाणी आवश्यक जागा नाही.

  • मध्यवर्ती भागात जमिनीचे दर खूप आहे. याचसोबत भूसंपादनालाही अडथळे येतील.

  • पुणे सोलापूर राष्ट्रीय महागार्ग तसेच मेट्रो या सर्व दृष्टीने हडपसर स्थानक सोयीचे असणार आहे.

  • पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग सोलापूर महामार्गाला समांतर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT