What is the schedule for the Bandra–Ajmer Weekly Superfast Express : मुंबईहून गुजरात, जयपूर अन् अजमेरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने खास गिफ्ट दिलेय. वांद्रे रेल्वे स्थानकातून अजमेरसाठी खास साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. अजमेरहून प्रत्येक रविवारी ही एक्सप्रेस वांद्रेसाठी सुटेल. तर वांद्रेहून प्रत्येक सोमवारी अजमेरसाठी एक्सप्रेस धावणार आहे. गुजरात अन् राजस्थानला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना या एक्सप्रेस ट्रेनचा फायदा होणार आहे. रेल्वेकडून एक्सवर ट्रेनचे वेळेपत्रक जारी केले आहे. (Western Railway introduces Bandra–Ajmer Weekly Superfast Express via Gujarat and Rajasthan to ease festive and seasonal rush.)
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस - अजमेर दरम्यान विशेष साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09622 वांद्रे टर्मिनस - अजमेर सुपरफास्ट विशेष रेल्वे प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी 09:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08:50 वाजता अजमेरला पोहोचेल. ही रेल्वे १४ जुलै ते २९ सप्टेंबरपर्यंत चालेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09621 अजमेर - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट विशेष रेल्वे प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी 06:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 04:15 वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही रेल्वे १३ जुलै ते २८ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक आठवड्याला धावेल.
वांद्रे स्थानक ते अजमेर यादरम्यान रेल्वेकडून साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस बोरिवली, वापीर, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, विक्रमगड अलोट, भिवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवई माधवपूर, जयपूर, किशनगड स्टेशनवर थांबेल. तिकिटासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
वांद्रे ते अजमेर यादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एसी 2-टियर, एसी 3-टियर, एसी 3-टियर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास बोगी असतील. ट्रेन क्रमांक 09622 साठी बुकिंग 12 जुलैपासून आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. या साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेनबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी. (How to book tickets for train number 09622 on IRCTC?)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.