Gondia Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Gondia Accident News: शेतीच्या कामासाठी गावाकडे निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; ट्रकच्या धडकेत बाप-लेकाचा दुर्देवी अंत

Gondia Accident News: गोंदिया जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख, साम टिव्ही

Gondia Accident News: गोंदिया जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना देवरी-रायपूर महामार्गावरील डोंगरगाव डेपोजवळ शनिवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास घडली. सुनील पोगळे (वय ३५) व सेवकराम पोगळे (वय ६०, रा. लोहारा) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवरी तालुक्यातील (Gondia News) लोहारा येथील रहिवासी असलेले सुनील पोगळे व सेवकराम पोगळे हे दोघेही बाप-लेक शनिवारी नागपूरवरून शेतीच्या कामासाठी गावाकडे निघाले होते. दरम्यान, मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने डोंगरगाव डेपोजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण (Accident News) होती की, बाप-लेक ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळापासून १ किमी अंतरावर ट्रक उभा करून पसार झाला. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी या घटनेची माहिती देवरी पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Gondia Police) घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलीस फरार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे लोहारा गावात शोककळा पसरली आहे.

सेवकराम पोगळे हे कुटुंबीयांसह नागपुरात राहत असले तरी वर्षांतून ते अनेकदा लोहारा येथे यायचे. येथे ते आठ-आठ दिवस मुक्कामी सुद्धा राहत होते. लोहारा शेती असल्याने ते शेती करण्यासाठी नेहमी ये-जात करीत असल्याचे लोहारा येथील गावकऱ्यांनी सांगितले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT