Gokul Milk Price Saam Tv
मुंबई/पुणे

Gokul Milk Price: शेतकऱ्यांना मोठा धक्का! गोकुळ दूध खरेदीत ३ रुपयांनी कपात

Gokul Milk Purchase Price Decreases: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोकुळ दूध खरेदीच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोकुळ दूध संघटनेकडून गायीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गोकूळ गायीचे दूध याआधी ३३ रुपयांनी खरेदी करत होते. त्यानंतर आता या दरात कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.शेतकऱ्यांकडून फक्त ३० रुपयांत दूध खरेदी केले जाणार आहे.

गोकुळ दूध संघटनेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप धक्कादायक आहे. निवडणुक संपताच गोकुळने हा निर्णय घेणे हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे. गोकुळ दुधाला जास्त भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना ३५ रुपये भाव दिला होता. ३० रुपये स्थायी भाव तर ५ रुपये अनुदान दिले होते. मात्र, आता या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.

गोकुळ दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून ३० रुपयांनी गोकुळ दूध खरेदी केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दूधाचे दर ४० रुपये व्हावे, यासठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. परंतु आता दूध खरेदीचे भाव ३० रुपये केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राज ठाकरे पुढील २ ते ३ दिवसांत पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Travel In Winter: नोव्हेंबरमध्ये बर्फवृष्टी पाहायची आहे का? भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

Ind vs Aus: पर्थचा कौल अखेर भारताच्याच बाजूने; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

Lucky Zodiac Sign: आज 'या' 5 राशींना मिळेल 'गुडन्यूज'; करिअरसह नात्याची फुलेल गुफंण

Amol Mitkari: ...याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता; अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला

SCROLL FOR NEXT