Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज वाहतुकीसाठी बंद

वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहनधारकांना करावा लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumabi News : मुंबईतील अंधेरी पूर्व - पश्चिमला जोडणारा गोखले पुल आज पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गोखले पुल हा धोकादायक असल्यामुळे मुंबई (Mumbai) महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे बंद करण्यासाठी पत्र दिले होते. मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) रविवारी रात्री बारा वाजेपासून गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे आता वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. मात्र हे पर्यायी मार्ग फार दूर असल्यामुळे वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहनधारकांना करावा लागणार आहे.

अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले फुल हा अत्यंत जीर्ण झाला होता. मागील दोन वर्षापासून त्याची एक मार्गीका पूर्णपणे बंद करून मार्गिका नव्याने उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र आज दुसरीही मार्गीका नव्याने निर्माण करण्यासाठी पुल बंद करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या दोन्ही बाजूने मोठयाप्रमाणावर बॅरिकेटिंग लावून हा पूल बंद केला आहे,

आज सकाळपासून गोखले पूल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधेरी परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अंधेरी पश्चिम पूर्व आणि पश्चिम परिसरात जाण्यासाठी वेगवेगळ्या 5 मार्ग वापरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आवाहन नागरिकांना करण्यात आला आहे. सध्या नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून कॅप्टन गोरे ब्रीज, मिलन सबवे,खार सबवे ,ठाकरे उड्डाणपूल,अंधेरी सबवे वापरणाचा सल्ला देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT