Kali Mata idol found dressed in Mother Mary attire in Chembur, triggering a major religious controversy. saam tv
मुंबई/पुणे

Goddess Idol Conversion: मुंबईत देवी-देवतांचं धर्मांतर; काली माता बनली 'मदर मेरी'

Kali Mata Idol Transformed Into ‘Mother Mary’ In Chembur: मुंबईतील चेंबूर परिसरात काली मातेची वेशभूषा 'मदर मेरी'सारखी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी मंदिरातील पुजाऱ्याला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्याने खळबळ

  • पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केलीय.

  • मुंबईतील चेंबरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

चेंबूर वाशी नका परिसरातील 'काली माते'च्या मूर्तीला 'मदर मेरी'चे कपडे घालण्यात आल्याने मोठी खळबळ उडालीय. देशातील अनेक ठिकाणी धर्मांतराचे प्रकार उघडकीस आले आहेत. मुंबईतही धर्मांतराचे प्रकार समोर आले होते. आता व्यक्तींचे नाही तर थेट देवी देवतांचं धर्मांतर करण्यात आल्याची घटना मुंबईतील चेंबूरमध्ये घडलीय.

चेंबूरमधील एका मंदिरात कालीमातेच्या मूर्तीला 'मदर मेरी'चे कपडे घातल्याने वाद निर्माण झालाय. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक झालीय. याप्रकरणी पुजाऱ्याला अटक करण्यात आलीय. हिंदुत्ववादी संघटनांनी पुजाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. पुजाऱ्यावर भारतीय दंडसंहिता कलम २९५ अ अन्वये अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भारतीय दंड संहितेच्या कलम २९५अ अंतर्गत जो कोणी जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्णपणे कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करून त्यांच्या धार्मिक भावना दुखावतो, त्याला तीन वर्षांपर्यंतच्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होत असते. हा कायदा धर्माच्या कोणत्याही अपमानाला लागू होतो.

काली माता बनली 'मदर मेरी'

चेंबरमधील वाशी नाका परिसरात असलेल्या काली मातेच्या मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. येथील कालीमातेला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले होते. काली मातेचं रुप मदर मेरी प्रमाणे करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे मंदिरातील पुजाऱ्यांनेच मदर मेरीचे कपडे देवीला घातले होते. याप्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या स्वप्नात काली माता आली होती.

देवीनेच आपल्याला मदर मेरीचे कपडे घालायला सांगितले, अशी माहिती पुजाऱ्याने दिली आहे. या पुजाऱ्याचे नाव रमेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात पुजाऱ्याला हजर केल्यानंतर न्यायालायने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. पोलिसांनी या प्रकरणी कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमागे मिशनऱ्यांकडून पैसे दिल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Travel : वीकेंडला वन-डे सहलीचा बेत आखताय? 'हे' आहे मुंबईतील विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण

Maharashtra Live News Update: धाराशिव बस डेपोमध्ये तीन तास डिझेल नसल्याने एसटी बस सेवा बंद

Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

Chanakya Niti: या ४ चूकांमुळे घरात येते गरिबी, हातात पैसा टिकत नाही; चाणक्यांनी सांगितले सत्य

Kolhapur Crime: सासऱ्याला लढायची होती निवडणूक, १० लाख रुपयांसाठी सुनेकडे तगादा; छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT