MNS News Saam TV
मुंबई/पुणे

गणेशोत्सवासाठी शाळांना ५ दिवसांची सुट्टी द्या; मनसेची शिक्षण विभागाकडे मागणी

दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई: गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) काळात सर्व शाळा, महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाकडे केली आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना (Corona) महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना निवेदन एक दिलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मनसेने (MNS) निवेदनामध्ये लिहलं आहे की, 'शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक सण व उत्सव इत्यादीच्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांच्या सुट्टयांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी स्थानिक ठिकाणांच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती / पालक शिक्षक संघ यांच्या सहमती अनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सव, दिवाळी व अन्य सण / उत्सव कालावधीत चाचणी परीक्षेचे आयोजन करु नयेत अशा सूचना दिल्या आहेत.

तथापि राज्य मंडळांच्या शाळां व्यतिरिक्त इतर मंडळांच्या खाजगी शाळांमध्ये सदर सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे.

गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई (Mumbai) परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात आपल्या मूळगावी जात असतात. गणेशोत्सवात ५ दिवस सुट्टी जाहीर करावी.

तसेच या काळात कोणत्याही परीक्षा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना आपण सर्व शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला द्याव्यात ही विनंती असं मनसेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. मनसेच्या या निवदेनानंतर शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ सर्व शाळांना उत्सव काळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शाळांना निर्देश देण्यात येतील असे सांगितल आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT