Girish Mahajan : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांनी फडणवीसांनी असत्त्याचा आधार घेतल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी 'मी या घटनेचा साक्षीदार आहे' असे म्हटले आहे.
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. ते म्हणाले 'जी वस्तुस्थिती आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ते कधीही खोटं बोलत नाहीत आणि भंपक विधाने देखील करत नाही. इतक्या वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवजींची सेना काय म्हणते याला आम्ही अजिबात महत्त्व देत नाहीत' अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
'मी देखील त्या सर्व चर्चेमधील एक भागीदार आहे. पहाटेचा शपथविधी ज्यावेळी झाला तेव्हा मी देखील त्या ठिकाणी होतो. त्यावेळेस मी, दादा आणि देवेंद्रजी आम्ही तिघेही त्या ठिकाणी होतो. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहित आहेत', असे गिरीश महाजन म्हणाले. (Latest Political news)
वस्तुस्थिती सांगितली म्हणजे कोणी असभ्य होत नाही, त्यापेक्षा तुम्ही काय काय केले हे एकदा पाहा आणि अंतर्मुख व्हा. मला या गोष्टींचा गौप्यस्फोट करायचा नाही, आमचे नेते देवेंद्रजी आहेत, ते या गोष्टी बोललेले आहेत असे महाजन म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.