Ghatkopar Hoarding Accident News Update Saam TV
मुंबई/पुणे

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत दुसरी अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ghatkopar Hoarding Collapsed Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hording Case) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने दुसरी अटक केली आहे. भावेश भिंडेनंतर (Bhavesh Bhinde) आता होर्डिंगच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेची आज मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे. मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला गुन्हे शाखेने अटक केली. पालिकेने मान्यता दिलेल्या या स्ट्रक्चरल इंजिनिअरविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. घाटकोपर येथील दुर्घटना ग्रस्त होर्डिंगला याने स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिले होते.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत पहिली अटक करण्यात आलेल्या भावेश भिंडेची पोलिस कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून कसून तपास आणि चौकशी सुरू आहे.

दरम्यान, मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेतील १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ७४ जण जखमी झाले होते. याप्रकरणातील काही जखमींवर अद्यापही राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी राजस्थानच्या जयपूरमधून भावेश भिंडेला पोलिसांनी अटक केली होती.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेकडून आता अनधिकृत होर्डिंग्सविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. बीएमसीकडून फक्त ४०X ४० फूटांच्या होर्डिंगला परवानगी आहे. असे असताना देखील भावेश भिंडेने घाटकोपरमध्ये १२० X १२० फुटांचे होर्डिंग लावले होते. हे होर्डिंग अनधिकृत होते. होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली. भावेश भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्याविरोधात पालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT