Pune Accident Saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

Pune Accident News : गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झालाय. मुंबई-बेंगळूरू महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे.

Akshay Badve

गौतमी पाटीलच्या वाहनाचा पुण्यात अपघात

वडगाव बुद्रुक परिसरात पहाटे पाच वाजता अपघात झाला

अपघातात रिक्षाचालक जखमी

गौतमी पाटील वाहनात नसल्याने तिला इजा झाली नाही

प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडक दिली. पुण्यातील मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात आज मंगळवारी पहाटे पाच वाजता हा अपघात घडला. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर सुदैवाने अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती.

गौतमी पाटीलच्या वाहनाने मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला उडवलं. वडगाव बुद्रुक परिसरात आज मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. तर या अपघात प्रकरणी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला ताब्यात घेतलं आहे.

अपघातात रिक्षाचालक जखमी

या अपघातात गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला धडक दिल्यामुळे रिक्षा चालकासह २ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात घडला, त्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. सामाजी विठ्ठल मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

कसा घडला अपघात?

गौतमी पाटीलच्या वाहनाची वडगाव पुलाजवळ असलेल्या एका हॉटेलसमोर रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात रिक्षाचे मोठं नुकसान झालं. तर अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातावेळी गौतमी कारमध्ये नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकाने मद्य प्राशन केले होते का नाही, याबाबत वैद्यकीय चाचणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावंडांसोबत फिरायचंय? मुंबईजवळची 'हे' पावसाळी पिकनिक स्पॉट्स ठरतील परफेक्ट

Salman Khan Video : 'बिग बॉस २०' मध्ये मोठा ट्विस्ट; स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य, सलमान खानने दिला इशारा, म्हणाला- "तथास्तु-टू"

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

SCROLL FOR NEXT