गौतमी पाटील चार दिवसांपासून संपर्काबाहेर आहे.
कार अपघात प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर गौतमी पाटील बेपत्ता आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फोन कॉलमुळे राजकीय वाद पेटलाय.
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
'इथं दिसेना, कुठं दिसेना, शोधू कुठं? असं म्हणण्याची वेळ पुणे पोलिसांवर आलीय. कारण गेल्या चार दिवसापासून गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाहीये. वाहन अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला सिंहगड रोड पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर राहण्यास बोलवलं होतं. परंतु गौतमी पाटील चार दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार अपघाताच्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळालंय. गौतमी पाटीलला अटक करण्यासाठी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन कॉल केला. त्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलंय. चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन केल्यावरून आमदार रोहित पवारांनी पाटलांवर टीका केली. आता याप्रकरणी नवा ट्विस्ट आलाय.
पुण्यामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता. या अपघात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गौतमी पाटील हिच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केलीय. कुटुंबियांच्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलिसांनी गौतमी पाटील यांना आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं. पोलिसांनी बजावलेली नोटीस स्वतः गौतमी पाटीलने स्वीकारली, पण मात्र गेल्या चार दिवसापासून गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाहीये. त्यामुळे गौतमी पाटील नेमकी गेली कुठे असा प्रश्न आता निर्माण होतोय.
पोलिसांनी बजावलेली नोटीस स्वतः गौतमी पाटीलने स्वीकारली, पण मात्र गेल्या चार दिवसापासून गौतमी पाटीलचा पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाहीये. त्यामुळे गौतमी पाटील नेमकी गेली कुठे असा प्रश्न आता निर्माण होतोय. पुण्यातील कार अपघात प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन कॉल करून गौतमी पाटील यांना अटक करण्याबाबत सांगितलं. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.