
गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर चालकाला अटक झाली असून रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमीवरही कारवाईची मागणी केली.
पुणे पोलिसांनी वाहन तिच्या नावावर असल्याने गौतमी पाटीलला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
Gautam Patil Car Accident Case: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची तरुणाईवरचं गारूड दिवसागणिक वाढतच चाललं आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसून येते. तिचं फॅनफाॅलोईंगही जबरदस्त वाढत चाललं आहे. आता याच नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे. गौतमीच्या वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. धडकेत रिक्षाचालक गंभीररित्या जखमी झाला.
हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईची मागणी केली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलला अटक करा, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे.
गौतमी पाटीलला अटक करावी, अशी मागणी करत रिक्षाचालकाचे कुटुंबीय थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणीही कुटुंबियांकडून पोलिसांकडे केली जात आहे. गौतमी पाटीलने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गौतमी पाटीलला अटक होणार?
पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस जारी केली आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडत दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता. वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने तपासासाठी सिंहगड रोड पोलिसांनी नोटीस जारी केली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी (३० सप्टेंबर) पहाटे अपघात घडला होता. या प्रकरणी गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामाजी विठ्ठल मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
अपघातानंतर कारचालक फरार झाला होता मात्र सी सी टिव्ही फुटेज तपासून पोलिसांनी ३० वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशी साठी हजर रहावे असे या नोटीस मध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे तपास योग्य होत नसल्याचा आरोप रिक्षा चालकाचे नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रिक्षा चालक यांच्यावर सध्या पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी आरोपी बदलला असल्याचं म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.