Ambernath Gas Leak Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath Gas Leak: अंबरनाथमध्ये गॅस गळतीनंतर नागरिक त्रस्त; डोळ्यांची जळजळ अन् श्वास घ्यायला त्रास, भितीचे वातावरण

Ambernath MIDC: अंबरनाथ एमआयडीच्या एका कंपनीमध्ये अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे.

Priya More

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता. या गॅस गळतीमुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. डोळ्यांची जळजळ, श्वास घ्यायला त्रास आणि घसा खवखवण्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली. तर एमपीसीबीच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला कंपनीत पाठवल्याची संतापजनक बाब समोर आली. त्यामुळे एमपीसीबीच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच आता कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ४३ वर निकाकेम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत रासायनिक उत्पादन केले जाते. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास या कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला. या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गॅस गळतीमुळे वातावरणातील दृश्यमानता कमी झाली आहे. याबाबत माध्यमांमधून प्रसारित झालेल्या बातम्यांद्वारे माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी शोधून काढली आणि तिथे येऊन पाहणी करत हा रासायनिक धूर थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या.

दुसरीकडे अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन मात्र नॉट रिचेबल होता. संतापजनक बाब म्हणजे त्यांनी स्वतः या ठिकाणी येणं अपेक्षित असतानाही त्यांनी आपल्या ड्रायव्हरला कंपनीत पाठवलं. या ड्रायव्हरने कंपनीचे फोटो आणि मालकाचा नंबर राजपूत यांना पाठवला आणि तिथून निघून गेला. त्यामुळे राजपूत यांच्या या बेजबाबदार वर्तनावर संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कारखाने असून तिथून सातत्याने रासायनिक वायू आणि जलप्रदूषण होत असतं. या प्रदुषणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तरी देखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे या कंपन्यांवर एमपीसीबीने कठोर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. मात्र त्यापूर्वी एमपीसीबीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी, अशीही मागणी आता होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT