Lonavala News , lpg gas saam tv
मुंबई/पुणे

Lonavala News : लोणावळ्यात अंध महिला गॅस कनेक्शनपासून वंचित, एजन्सीनं दिलं लेखी स्पष्टीकरण; राजकीय पदाधिकारी मैदानात

या प्रकारानंतर राजकीय पदाधिका-यांनी गॅस एजन्सीला जाब विचारु असं म्हटलं आहे.

दिलीप कांबळे

Lonavala News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात उज्वल गॅस योजना सुरू केली. ज्यामुळे ग्रामीण भागासह गरीब कुटुंबातील महिलांना गॅस वापरता येईल. याचा प्रचार प्रसार सर्वत्र केला जात आहे. मात्र मोदींच्या या योजनेला लोणावळ्यात मोडीत काढण्यात आले आहे असा आराेप महिलेकडून केला गेला. (Maharashtra News)

केवळ अंध आहे म्हणून गॅस कनेक्शन एका महिलेला नाकारण्यात आलं आहे. अंध असल्याने गॅस कनेक्शन देऊ शकत नाही असं थेट गॅस एजन्सी मालकाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई येथील रहिवासी असलेल्या संगीता कोल्हापूरे यांची बदली नुकतीच लोणावळा येथे झाली. त्यानंतर त्यांनी लोणावळ्यात एक खोली भाड्याने घेतली. जेवण बनविण्यासाठी त्यांना गॅस ची आवश्यकता असल्याने त्यांनी लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सी कडे नवीन गॅस कनेक्शनची मागणी केली. परंतु परमार गॅस एजन्सीने त्यांना कनेक्शन नाकारले.

याबाबत त्यांनी विचारणा केली असता एजन्सीने तुम्ही अंध असल्याने कनेक्शन देऊ शकत नाही असे सांगितले. तसे गॅस एजन्सीने (lpg gas) त्यांना लेखी लिहून देखील दिले. मात्र अंध असले तरी पोटासाठी जेवण बनवावे लागत असल्याची भावना संगीता कोल्हापूरे या अंध महिलेने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

दरम्यान परमार गॅस एजन्सीचे मालक प्रकाश परमार म्हणाले आमचे काही नियम आहेत. त्यानुसार आम्ही त्यांना परवानगी नाकारली आहे. भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असेही परमार यांनी नमूद केले.

हक्क मिळवून देऊ

काँग्रेसचे पदाधिकारी निखिल कवीश्वर म्हणाले समाजात वावरताना अंध किंवा अपंग असले तरी त्यांना जगण्याचा अधिकार आहे. लोणावळ्यात अंध महिलेबरोबर घडलेला प्रकार हा निंदनीय असून याबाबत संबंधित गॅस एजन्सी मालकाला जाब विचारला जाईल.

दुसरीकडे सुरेखा जाधव (माजी नगराध्यक्षा, भाजप) यांनी देखील भाजपा सर्वच गॅस एजन्सी मालकांना याबाबत विचारणा करेल. तसेच काेणी मुजोरी करीत असेल तर ती थांबवावी असा इशारा दिला.

सरकारचा अंकुश हवा

केवळ अंध असल्याने गॅस एजन्सीने नवीन गॅस कनेक्शन नाकारले. परंतु अंध असल्याने रोज मुंबई पुणे प्रवास करू शकत नसल्याने संगीता कोल्हापूरे यांनी लोणावळ्यात राहण्याचा निर्णय घेतला. परंतु मुजोरी करणाऱ्या गॅस एजन्सी चालकांवर या डोळस सरकारने अंकुश ठेवावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT